छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

दिनांक 13 फेब्रुवारी 2021: – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘ नालंदा बुद्ध विहार व्यवस्थापन समिती ‘  प्रबुद्ध नगर मांजरी आयोजित भव्य हाप पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आज सकाळी 11.00 वाजता ” सांची मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.  विनोद (भैय्या) उबाळे व मेथवडे गावचे युवा नेते अमोल दादा गंगथडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सामना समितीतील प्रमुख पदाधिकारी सुशील उबाळे’ अमोल कांबळे’ सुजय चंदनशिवे ‘अमर उबाळे’ संतोष चंदनशिवे’ नंदकुमार उबाळे ‘सुरज उबाळे ‘निलेश उर्फ बाबू आणि पिंटू जगताप इंजि.भीम मागाडे हे आदी.

उपस्थित होते तसेच परगावहून आलेले खेळाडू गावातील क्रिकेट प्रेमी जेष्ठ नागरिक व परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.. उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. विनोद (भैया ) उबाळे यांनी खेळाडूंना स्वतःच्या शरीराची काळजी घ्या व सामने शांततामय वातावरणात पार पाडा असे आव्हान करून शुभेच्छा दिल्या… सदर सामन्याची सुरुवात आज पासून झालेली असून साधारणत चार ते पाच दिवस चालू राहतील अशी माहिती आयोजक सुशील (भाऊ)  उबाळे यांनी दिली..

What do you think?

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जननायक, महाराष्ट्र प्रदेश – व्यावसायिक कार्यकर्ते साठी मोफत संगणक माहिती अँड ऑनलाइन सुरक्षा सल्ला व मार्गदर्शन