Home Uncategorized सोलापूर शहर नव्हे खड्डापूर शहर संभाजी ब्रिगेडने लावला फलक

सोलापूर शहर नव्हे खड्डापूर शहर संभाजी ब्रिगेडने लावला फलक

26
0

दै. जननायक सोलापूर( प्रतिनिधी)- सोलापूर शहरांमध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजन शून्य ढिसाळ कारभारामुळे एकाच वेळी सर्वच ठिकाणी रस्ता खोदाई चे काम सुरू असल्यामुळे चांगल्या रस्त्याची वाट लागलेली आहे त्यामुळे सोलापुरातील नागरिकांना व बाहेरून आलेल्या नागरिकांना प्रचंड हाल सोसावी लागत आहे स्मार्ट सिटीत समावेश असणार्‍या सोलापूर शहर हे खड्ड्यांचे शहर म्हणून नवीन ओळख होण्याची शक्यता नाकारता येत नाही सोलापूर हे स्मार्ट सिटी आहे का खड्ड्यांची सिटी आहे अशी बाहेरील येणार्‍या लोकांची धारणा होईल त्यामुळे संभाजी ब्रिगेड च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोलापूर शहर नव्हे तर खड्डापूर शहर असे फलक लावून महानगरपालिकेला सुबुद्धी यावी व लवकरात लवकर हे शहर खड्डेमुक्त होऊन चांगले रस्ते व्हावे यासाठी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

सोलापूर शहरात ड्रेनेज व जलवाहिनी टाकण्याची कामे एकसाथ सुरू आहेत. यामध्ये शहरातील सर्वच रस्त्यावर सर्वाधिक भागांमध्ये रस्त्यांची खोदाई केलेली आहे. अनेक ठिकाणी तीन ते चार फुटाचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा प्रश्‍न अधिकच अडचणीचे बनला. तसेच शहरातील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत. या रस्त्यावर चारचाकी वाहने, तर सोडाच पण अगदी दुचाकी चालवता येत नाहीत. दुचाक्‍यांची संख्या वाढली, तर पादचाऱ्यांना पायी जाण्यासाठी रस्ता राहत नाही. अनेकवेळा काही भागांमध्ये सायंकाळनंतर पथदिव्यांचा प्रकाश कमी असतो. छत्रपती शिवाजी महाराज चौक मोबाईल गल्ली, नवी पेठ, फौजदार चावडी, चाटी गल्ली, मधला मारुती, भांडे गल्ली व हद्दवाढ आदी भागांमधील सर्व रस्ते खोदकामामध्ये अडकले आहेत
खड्डेमय रस्त्यांवर वाहन चालवल्याने मान आणि मणक्याचे दुखणे सुरू होते. वृध्दांना कंबरेचा त्रास होतो तसेच वाहनांचे सुधा नुकसान होते अधिक धूळ तयार होऊन श्वसनाचे व डोळ्याचे आजार निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही भागात चांगले असलेले रस्ते खोदण्यात आले आहे काम झाले तरी नवीन रस्ते न करता मुरुम टाकून बुजविण्यात आले आहे.
सोलापूर शहरातील रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून चांगल्या दर्जाचे रस्ते करावेत अन्यथा संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले,कार्याध्यक्ष अरविंद शेळके, नागेश पवार, उपशहरप्रमुख आशुतोष माने, सीताराम बाबर सोमनाथ पात्रे,सचिव सनी पाटू, राहुल घोडके, महेश तेल्लुर, विजय क्षीरसागर, मेऊल बुरे,इलियास शेख, शाहरुख पटेल, रमेश तरंगे, अक्षय साळुंखे, विनोद झळके, अक्षय जाधव, बसवराज आळंगे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here