दै. जननायक (सोलापूर/प्रतिनिधी):- जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवून मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन …मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे . त्यानंतर मेडिकल प्रवेशासाठी तयारी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले . त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये . विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी तात्काळ सुपर न्यूमरी पद्धतीने प्रवेश देत प्रवेशाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सकल मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिली निवेदन देताना सकल मराठा समाज समनव्यक माऊली पवार, श्याम कदम, अजिंक्य पाटील, प्रियांका डोंगरे वैभवी पवार, मानसी मोरे, आकांक्षा राठोड, गायत्री चारोटे,समृद्धी पाटील,समीक्षा माने वसुधा धपाटे,बसवराज जमखंडी, प्रतीक गोसावी ओंकार सावंत ऋतुराज कोठीवाले, अभिषेक मोडे आदी उपस्थित होते.