Home Uncategorized तुंगत येथे भारत भालके यांना श्रद्धांजली अर्पण…

तुंगत येथे भारत भालके यांना श्रद्धांजली अर्पण…

30
0

दै.जननायक (तुंगत /पंढरपूर )-पंढरपूर , मंगळवेढ्याचे आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कै. भारत नाना भालके यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. याबद्दल तुंगत येथील छत्रपती चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा युवा आघाडी व तुंगत ग्रामस्थांच्यावतीने कै.भारत नाना भालके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पसायदान म्हणत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
याप्रसंगी सरपंच आगतराव रणदिवे , उपसरपंच पंकज लामकाने , प्रगतशील बागायतदार तानाजी पाटील , नवनाथ बापू रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर गायकवाड ,सोसायटीचे मा. उपाध्यक्ष करीम मुलांणी ,श्रीकांत आवताडे, विठ्ठल गायकवाड ,शिवाजी इंगळे, गजेंद्र रणदिवे ,निवेदक वैजिनाथ रणदिवे, अजित रणदिवे, विक्रम लामकाने,तौसिफजमादार ,संतोष वाघमारे ,संजय रणदिवे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here