Home Uncategorized विधानपरिषद म्हणजे पुनर्वसन केंद्र नसून विद्वत्तांची सभा आहे. – प्रविण गायकवाड 

विधानपरिषद म्हणजे पुनर्वसन केंद्र नसून विद्वत्तांची सभा आहे. – प्रविण गायकवाड 

65
0
Whatsapp

 

दै. जननायक: – सोलापूर( प्रतिनिधी) – देशातील सहा राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तीत्वात आहे. विधानसभेतून विद्वत्ताना प्रतिनिधित्व मिळेलच असे नाही. राज्याच्या विविध क्षेत्रातील जाणकारांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग असावा, त्यांच्या व्यासंगाचा राज्यकारभारात उपयोग व्हावा यासाठी विधानपरिषदेची निर्मिती झाली आहे. या मतदार प्रक्रियेत पक्ष आणि त्यांच निवडणूक चिन्ह याचा कोठे ही उल्लेख आढळत नाही. म्हणजेच राजकारण विरहित प्रतिनिधी असावं असा संकेत आहे. पण आज मात्र हा जेष्ठांच सभागृह राजकीय कार्यकर्त्यांच पुनर्वसन केंद्र झाले आहे. संविधानाला अभिप्रेत असा प्रतिनिधी म्हणून डॉ श्रीमंत कोकाटे हे एकमेव उमेदवार आहेत त्यांनाच आपलं पसंदी क्रमांक एक देवून जेष्ठ अशा विधानपरिषदेची स्वायत्ता राखावी असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार जेष्ठ विचारवंत डॉ श्रीमंत कोकाटे यांच्या प्रचारार्थ डॉ निर्मलकुमार फडकूले सभागृहात पदवीधरांच्या मेळाव्यात विचार व्यक्त केले.
उमेदवार डॉ श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या भाषणात बेरोजगार पदवीधरा पासून ते डॉक्टर, विधिज्ञ, व्यवसायीक, नोकरदार, शेतकरी , गृहीणी अश्या विविध क्षेत्रातील पदवीधरांच्या समस्या या वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या समस्यांवर उपाय काढण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. ज्येष्ठांचा सभागृहाच महत्त्व वाढवून त्याची प्रतिष्ठा वाढवण्याच काम करणार आहे. आपल्या पुढच्या पिढीच भविष्य बळकट करण्यासाठी माझी उमेदवारी आहे असं मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर युवा उद्योजक गणेश माने देशमुख संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष अमरजीत पाटील डॉ. रावसाहेब पाटील डी. एन. गायकवाड इरफान सय्यद संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले इत्यादी उपस्थित होते. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या मेळाव्याचे संयोजन संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांनी केले होते.
यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद व जुनी पेन्शन हक्क समिती च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड चे लखन थिटे सीताराम बाबर अरविंद शेळके नागेश पवार संजय भोसले सुलेमान पीरजाडे पिंटू पांढरे विनोद आगलावे हनुमंत पवार दत्ता पवार धर्मा भोसले बसवराज आळगे अजित शेटे सत्यम सुर्यवंशी जुनी पेन्शन संघटनेचे आशिष चव्हाण राम शिंदे प्रमोद कुपेकर पद्मसिंह व्हरडे सरदार नदाफ लंबे सर आदींसह पदवीधर मतदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here