Home Uncategorized *देशातील ही पहिली क्रांतिकारक योजना सोलापूर जिल्ह्यात पथदर्शक तत्त्वावर सुरू करण्याचा प्रफुल्ल...

*देशातील ही पहिली क्रांतिकारक योजना सोलापूर जिल्ह्यात पथदर्शक तत्त्वावर सुरू करण्याचा प्रफुल्ल कदम यांचा आग्रह*

12
0

*दलित व आदिवासी नवीन उद्योजकांना मोफत वीज आणि वीज सुविधा योजना सुरू करण्याची प्रफुल्ल कदम यांची ऊर्जामंत्र्यांकडे अभ्यासपूर्ण मागणी**प्रफुल्ल कदम यांनी दलित अर्थकारणा संबंधी अनेक धक्कादायक  बाबी आणल्या समोर…*

 

 

 

दलित व आदिवासी घटकांचा उद्योग व व्यवसायांमध्ये अत्यंत कमी असलेला सहभाग वाढवण्यासाठी नवीन उद्योजकांना काही मर्यादेपर्यंत मोफत वीज आणि जलद वीज सुविधा देण्याची देशातील पहिली क्रांतिकारक योजना महाराष्ट्र राज्यात सुरू करण्याबाबतचा मागणी प्रस्ताव काल किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सादर केला आहे.

 

या निवेदनात त्यांनी अनेक धक्कादायक बाबी  निदर्शनास आणल्या आहेत.आज दलित व आदिवासी  घटकांची आर्थिक विषमता केवळ नोकरीतील आरक्षणातून दूर होणे अवघड आहे हे आता स्पष्ट झाले असल्याने व्यापार-उद्योग क्षेत्रात त्यांचा सहभाग व विस्तार वाढवणे आता खूपच गरजेचे झाले आहे. आज उद्योगांच्या मालकीचे  प्रमाण विचारात घेतले तर केवळ 4 ते 5 टक्के मालक आदिवासी वर्गातील तर केवळ 7 ते 8 टक्के मालक दलित वर्गातील आहेत. हे उद्योगही मुंबई, ठाणे,पुणे, नागपूर या नागरी भागातच आहेत. यामध्येही  विणकरांचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळेच एकूण औद्योगिक वीज वापरात दलित उद्योगांचा वापर केवळ 23 ते 25 टक्के होत आहे. आणि एकूण औद्योगिक कामगारांपैकी  केवळ 5 ते 6 टक्के कामगारच दलित उद्योगात आहेत. एकूणच उद्योग क्षेत्रातमध्ये दलित व आदिवासी सहभाग अत्यंत कमी व चिंताजनक आहे. याचा थेट परिणाम सामाजिक व आर्थिक समतेवर होत आहे.

 

यासाठी दलित व आदिवासी वर्गाचा उद्योग-व्यवसायातील सहभाग वाढवण्यासाठी नवीन उद्योजकांना प्रत्यक्ष लघु व मध्यम उद्योग उभारण्यासाठी काही मर्यादेपर्यंत मोफत वीज मिळाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना वीज सुविधाही जलद आणि सहज मिळाली पाहिजे. यासाठी विशेष योजना तत्काळ सुरु झाली पाहिजे. सुरुवातीला ही योजना सांगोला तालुक्यामध्ये अथवा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू केल्यास या एकूण योजनेचे एकूण समन्वय, सनियंत्रण आणि अंमलबजावणी साठी मदत करण्यास तयार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी स्पष्ट केले आहे. ऊर्जामंत्री यांनी सदर अभ्यास प्रस्ताव अभ्यासासाठी तज्ज्ञ मंडळींकडे  पाठवला असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले आहे.

देशातील आर्थिक विषमता दूर करण्याच्या दृष्टीने आणि बंधुता निर्माण होण्यासाठी जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत दलित व आदिवासी वर्गात उद्योग व व्यापार संस्कृती आणि मानसिकता वाढीस लागणे आज खूप गरजेचे असल्याचेही प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here