Home Uncategorized जुळे सोलापूर येथे शहिदांना अभिवादन ….

जुळे सोलापूर येथे शहिदांना अभिवादन ….

30
0

दै. जननायक. सोलापूर (प्रतिनिधी) :- जुळे सोलापुरातील दावत चौकामध्ये युवकांच्या वतीने देशासाठी लढताना ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या वीर जवानांना वीरमरण आले त्यांना विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील व संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक पाटील साहेब म्हणाले की , अशा परिस्थितीमध्ये खंबीरपणे कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे वीर जवानां मुळेच आज आपण सुरक्षित आहोत. इकडे आपण दिवाळी साजरी करत असताना तिकडे सीमेवर सीमेचे रक्षण करताना शत्रूंच्या  गोळ्या खात वीर मरण आले. त्यांचे बलिदान युवकांनी विसरता कामा नये असे विचार मांडले.
यावेळी स्वप्नील शिंदे , शंकर पडसलगी, जयेश नाईक ,संभाजी ब्रिगेड चे उपशहर प्रमुख अशितोष माने ,अरविंद शेळके ,अजित शेटे ,सनी पाटू ,अक्षय महागावकर, संतोष फुलारी ,किरण गावडे , विनायक गुरूंचे,  गणेश शिंदे,  सागर गुजरे आणि प्रचंड साई बसर्गी विनय सुतार करण लामतुरे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here