Home Uncategorized छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास सोमेश यावलकर यांची एक लाख रुपयांची देणगी

छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास सोमेश यावलकर यांची एक लाख रुपयांची देणगी

37
0
  1. सांगोला :- दै.जननायक (संपादक :- विनोद भैय्या उबाळे ) :- रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कार्यास एक लाख रुपयांची देणगी दिली आहे.
    सांगोला शहरातील सामाजिक कार्यकर्ते, रेवनील ब्लड बँक, जयहिंद नागरी सहकारी पतसंस्था, यशराजे पॅरामेडिकल कॉलेज व यश क्लिनिकल लॅबोरेटरीचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले होते. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सोमेश यावलकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कार्यास एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. एक लाख रुपयांचा धनादेश सोमेश यावलकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीकडे सुपूर्त केला. यावेळी शिवप्रेमी उपस्थित होते.
    सांगोला शहर व तालुक्यातील जनतेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कार्यास जमेल तशी मदत करून सहकार्य करावे. नागरिकांनी स्वतःला शक्य असेल तेवढी देणगी अश्वारूढ पुतळा उभारणीच्या कार्यास देऊन आपला हातभार लावावा असे आवाहन रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here